सरळसेवा स्पर्धा परिक्षा -२०२३ बाबत सूचना
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्यााखालील शासकीय वैद्यकीय/दंत/ आयुर्वेद/ होमीओपॅथीक / महाविद्यालय व सलंग्नित रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य़ केंद्र विभागातंर्गत गट क परिचर्या व तांत्रिक/अतांत्रिक संवर्गातील रिक्त़ पदे सरळसेवेने भरण्याकरीता स्पर्धा परिक्षा -२०२३ आयोजित करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धा परिक्षा महाराष्ट्रातील विविध केंद्रावर दि.12 जून ते दि.20 जून, 2023 या दरम्यान तीन सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे.

परिक्षार्थींना परिक्षेचा दिनांक, ठिकाण व वेळ याबाबतची सविस्तर माहिती प्रवेशपत्रावर उपलब्ध करुन देण्यात येईल. सदरचे प्रवेशपत्र आपल्या लॉगीन आईडीवर तपासावे. ही बाब परिक्षार्थींना एस.एम.एस व ई.मेलव्दारे कळविण्यात येईल.